25 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home क्रीडा हिवरा येथे आंतरविद्यालयीन कबड्डी स्पर्धा संपन्न

हिवरा येथे आंतरविद्यालयीन कबड्डी स्पर्धा संपन्न

0
28

गोंदिया,दि.27ः- तालुका मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या डाँ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यालय, हिवरा येथे आंतरविद्यालयीन कबड्डी स्पर्धा दि. २२ ते  २३ डिसेंबरला पार पडल्या.या स्पर्धेत गोंदिया भंडारा जिल्हयातील सर्व घटक कृषी तंत्र विद्यालयाचे कबड्डी स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. ही कबड्डी स्पर्धा  राजेशसिंह परीहार (अध्यक्ष तंटामुक्त गाव समिती) यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.स्पर्धेचे उदघाटन पोलीस पाटील विनोद इं. नंदेश्वर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ए.एन. सुरपाम, व्ही.एन. राऊत, आर.डी. इंदोळे, आय.जी. राऊत, टि.ए. कठाणे, बी.एस. लांजेवार, के.एम.पालांदुरकर, श्रीमती व्ही.आर. शंभरकर, श्रीमती ए.व्ही. नगराडे, लखन गलबले, कु. पी.आर. लांडगे, मंगेश बगमारे, कु. ए.बी. डोंगरे, कु. पी.सी. मेश्राम, अतुल फुले, बी.बी. मेश्राम, आर.पी. शहारे आदी उपस्थित होते.संचालन इसुलाल राऊत यांनी केले.