ब्लॉसमचे विध्यार्थी तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत अव्वल

0
18

देवरी: 22 :ब्लॉसम पब्लिक स्कुल आपल्या वेगवेगळ्या उपक्रमासाठी नेहमीच चर्चेत असते. बौद्धिक स्पर्धा असो वा क्रीडा स्पर्धा, नृत्य असो वा गायन, गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून तर दप्तराच्या ओझा कमी करण्याच्या विविध क्षेत्रात यशाचे शिखर गाठणाऱ्या विध्यार्थ्यांना घडविणारी नक्षलग्रस्त तालुक्यातील एक लोकप्रिय शाळा. प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांच्या मार्गदर्शनात निरनिराळे सहशालेय उपक्रम आणि त्यामधून विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास कसा घडविता येणार याचे वेळोवेळी कार्यशाळा राबवून विध्यार्थ्यांना घडविण्याचे प्रयत्न चालविले जातात.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय क्रीडा व शिक्षण विभाग आणि जिल्हा क्रीडा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत 14 वर्षे वयोगटात शाळेतील मुले आणि मुली सहभागी झाले होते. सदर खेळाडू विध्यार्थी तालुक्यातून अव्वल आले असून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी यांची निवड झाली आहे. क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक राहुल मोहुर्ले यांच्या प्रशिक्षणामुळे वयोगट 14 चे स्पर्धक देवांस अग्रवाल, मिहीर अग्रवाल मोक्ष साखरे आणि राजवर्धन उके तर मुली वयोगट 17 मध्ये सिद्धी थोटे, गुंजन भांडारकर आणि विधीसा गर्ग यांची निवड झालेली आहे.
विजेत्या सर्व स्पर्धकांनी यशाचे श्रेय प्राचार्य डॉ सुजित टेटे, क्रीडा शिक्षक आणि पालकांना दिले.