वाशिम, दि. ०९ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ४ ते ६ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा स्थानिक जिल्हा क्रीडा संकुल येथे झाल्या. या स्पर्धेतून व निवड चाचणीतून छत्तीसगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा संघ जाहीर करण्यात आला आहे.यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये, संघ निवड समितीचे सदस्य किशोर बोंडे, अनिल सातव, महेश खर्डेकर यांची उपस्थिती होती.
१४ वर्षे वयोगटातील मुले संघ – भागवत होरगुळे (लातूर विभाग), ऋषिकेश वैजनाथ जाधव (लातूर विभाग), प्रवीण पंडित पाटील (कोल्हापूर विभाग), विश्वजीत बाबासाहेब साळुंखे (अमरावती विभाग), युनुस अख्तर शेख (कोल्हापूर विभाग), निलेश मोहन पारबी (मुंबई विभाग), गणेश छगन नरवाडे (मुंबई विभाग), बाबुराव दत्ता जाधव (औरंगाबाद विभाग), पीयूष अजयशंकर तिवारी (मुंबई विभाग), सौरभ वैजिनाथ सिरसाट (पुणे विभाग), ओम अभिजित काटे (पुणे विभाग), आकाश कृष्णा राठोड (औरंगाबाद विभाग). राखीव- करण मोतीराम घटे (मुंबई विभाग), ज्ञानेश्वर महिपतराव पोले (औरंगाबाद विभाग), ताहीद खदिर शेख (अमरावती विभाग), रोशन मुकेश राय (मुंबई विभाग), किरण लक्ष्मण गुंजाळ (पुणे विभाग).
१४ वर्षे वयोगटातील मुली संघ – स्नेहा प्रेमसिंग पावरा (पुणे विभाग), पूजा कृष्णा पाडवी (पुणे विभाग), हर्षदा संतोष भवर (औरंगाबाद विभाग), कल्याणी रामदास फन्से (औरंगाबाद विभाग), श्वेता तानाजी सावंत (कोल्हापूर विभाग), उमा शेषराव चव्हाण (अमरावती विभाग), श्रद्धा सुरेश सोनगडे (नाशिक विभाग), हर्षला दीपक लोढे (मुंबई विभाग), प्रतीक्षा काळूराम लांडगे (पुणे विभाग), जयश्री जहाऱ्या बारेला (पुणे विभाग), सिद्धी संजय चौगुले (कोल्हापूर विभाग), सृष्टी दशरथ ढोले (नागपूर विभाग). राखीव- नक्षत्रा गजानन इंगळे (अमरावती विभाग), पूजा रामसेवक प्रसाद (औरंगाबाद विभाग), पियुष्का जितेंद्र शिंदे (मुंबई विभाग), वैष्णवी रवी गिरधर (नागपूर विभाग), वैष्णवी पांडुरंग गायकवाड (कोल्हापूर विभाग).




