23.4 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ न.पं. कर्मचार्‍यांच्या कामबंद आंदोलनाला सुरुवात

न.पं. कर्मचार्‍यांच्या कामबंद आंदोलनाला सुरुवात

0
40

गोंदिया,दि.09ः- गेल्या अनेक दिवसांपासून न.प.चे मुख्याधिकारी सुट्टीवर गेले असून नगर परिषद वार्‍यावर आहे. यात मागील सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याचे वेतन कर्मचार्‍यांना देण्यात आले नाही. दिवाळीसारख्या सनामध्ये सुद्धा मिळणारे ‘फेस्टीवल अँडवांस’ मिळाले नाही. परिणामी कर्मचार्‍यांची दिवाळी अंधारात गेली असून कुटूंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. दरम्यान न.प.चे कार्यभार प्रभारी मुख्याधिकारी जाधव यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मात्र, त्यांनी सुद्धा आपली जवाबदारी पार न पाडल्याने कर्मचार्‍यांमध्ये प्रशासनाप्रती आक्रोश निर्माण झाले असून त्यांनी (दि.८) पासून कामबंद आंदोलनाला सुरवात केली आहे.
या संदर्भात नगर परिषद कर्मचार्‍यांनी मागण्यांचे पुर्ततेबाबत २३ ऑक्टोबरला प्रभारी मुख्याधिकार्‍यांना तसे पत्र देण्यात आले होते. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. कर्मचार्‍यांच्या कामबंद आंदोलनामुळे शहरातील नागरिकांना मोठय़ा असुविधेचा सामना करावा लागणार आहे.यासाठी प्रशासन पूर्णत: जवाबदार राहील अशी माहिती नगर परिषद कर्मचार्‍यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे. या कामबंद आंदोलनाला नगर परिषदेच्या सर्वच विभागातील कर्मचार्‍यांचे सहभाग असल्याचेही सांगण्यात आले.
या आंदोलनाला यशस्वी करण्याचे आवाहन, आंतरिक लेखा परिक्षक बद्दलवार, कर विभागाचे श्याम शेंडे, प्रदीप घोडेस्वार, गणेश मौजे, दिनेश शुक्ला, श्री बसेना, श्री गौतम, आस्थापना विभागाचे भुपेंद्र शनिवारे, मनिषा, असेसमेंट विभागातून नियाज अली, किशोर पारधी, श्री रहांगडाले, श्री चाचेरे, संगणक विभागातील प्रवीण गडे, शिव हुकरे, विधी विभागाचे संतोष ठवरे, स्वास्थ्य विभागाचे गणेश हथकैय्या, मनिष बैरीसाल, मुकेश शेंद्रे, तिलक दीप, राजेश खांडेकर, राजा दरबारी, जियालाल शेंद्रे, पारबती रसकेल, रानी हथकैय्या, कविता ईमलाह, सरस्वती दीप, लायसेंस विभागाचे सी.एल. पटले, नांदनकर, माने, जी.पी.एफ. विभागाचे रतन पराते, पेंशन विभागाचे आर.व्ही. दुबे, पुरूषोत्तम रहांगडाले, किशोर वर्मा व प्रशासकीय अधिकारी श्री राणे आदी कर्मचार्‍यांनी सहकार्य केले. अशी माहिती गोंदिया नगर परिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष जहीर अहमद यांनी

blank