गोंदिया दि.9 : जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील 14 गावे/वाड्यामध्ये, अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील 21, सालेकसा तालुक्यातील 10, सडक/अर्जुनी तालुक्यातील 1, देवरी तालुक्यातील 6 व गोरेगाव तालुक्यातील 7 गावे/वाड्यामध्ये 59 नविन विंधन विहिरींच्या कामांना जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी टंचाई निवारणाच्या कामासाठी असलेल्या अधिकाराचा वापर करुन प्रशासकीय मान्यता दिली आहे. तिरोडा तालुक्यातील सरांडी येथे वासुदेव कटरे यांच्या घराजवळ, पांजरा येथे विनाबाई आसोले यांच्या घराजवळ, विहिरगाव येथे भुपेंद्र रहांगडाले यांच्या घराजवळ, बोपेसर येथे रामदास कटरे यांच्या घराजवळ, मेंढा/रावणघाटा येथे जगन शहारे यांच्या घराजवळ, बेरडीपार येथे देवानंद नागपुरे यांच्या घराजवळ, ठाणेगाव येथे खेमराज पटले यांच्या घराजवळ, गराडा येथे ललित फटींग यांच्या घराजवळ, खमारी येथे गोपीचंद बागडे यांच्या घराजवळ, भिवापूर येथे ग्रामपंचायत जवळ, इंदोरा/खु. येथे मोहन चौधरी यांच्या घराजवळ, रुस्तमपुर येथे जागेश्वर मेश्राम यांच्या घराजवळ, डोंगरगाव येथे अनंतराम सोनवाने यांच्या घराजवळ, खडकी येथे रविंद्र कटरे यांच्या घराजवळ.
अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथे पितांबर वाघमारे यांच्या घराजवळ, रामपुरी येथे बिरसा मुंडा पुतळ्याजवळ, जांभळी येथे सदाशीव कुसतोडे यांच्या घराजवळ, झाशीनगर येथे पाण्याच्या टाकीजवळ, सावरटोला येथे शिवाजी हायस्कूल जवळ व देवराम भेंडारकर यांच्या घराजवळ, घुसोबाटोला येथे प्राथमिक शाळेजवळ, सिलेझरी येथे हेमराज फुलबांधे यांच्या घराजवळ, निमगाव येथे रामदास मेश्राम व रेवचंद हुकरे यांच्या घराजवळ, तिडका/क. येथे बाबुलाल नारनवर यांच्या घराजवळ, बोळदे/क. येथे मंसाराम औरासे यांच्या घराजवळ, झरपडा येथे तुलाराम मस्के यांच्या घराजवळ, ताटगावटोली (ताटगाव) येथे नेताजी कापगते यांच्या घराजवळ, खामखुर्रा येथे मुखरु मेश्राम यांच्या घराजवळ, सावरी येथे सुखदेव ठाकरे यांच्या घराजवळ, कनेरी येथे हिवराज साखरे यांच्या घराजवळ, केशोरी येथे अर्जुन गहाणे यांच्या घराजवळ, गार्डनपुर (केशोरी) येथे हनुमान मंदिरजवळ, गवर्रा येथे बिरसा मुंडा पुतळ्याजवळ, तुकुम नारायण येथे नविन ग्रामपंचायत जवळ.
सालेकसा तालुक्यातील दरबडा येथे कृष्णकुमार पटले यांच्या घराजवळ, लोहारा येथे छोटुलाल कटरे व नरेश येरणे यांच्या घराजवळ, कोटरा येथे करुणा बुध्दविहार जवळ, बिजेपार येथे नारायण वालदे यांच्या घराजवळ, खडकाळीटोला/महाराजटोला (कहाली) येथे मोतीलाल लिल्हारे यांच्या घराजवळ, पिपरीया येथे दुर्गा मंदिर जवळ, कोटजांभोरा येथे जयेंद्र शेंडे व अमर लिल्हारे यांच्या घराजवळ, नवाटोला (कोटरा) येथे अमित घासले यांच्या घराजवळ. सडक/अर्जुनी तालुक्यातील कोहमारा फाटा (कोहमारा) येथे अभिषेक गुप्ता यांच्या घराजवळ.
देवरी तालुक्यातील आमगाव येथे मनीराम कुंभरे यांच्या घराजवळ, कडीकसा येथे उदेलाल काटींगा यांच्या घराजवळ, शेडेपार येथे पाण्याच्या टाकीजवळ, मेहताखेडा येथे बाळकृष्ण धानगाये यांच्या घराजवळ, सुंदरी (पिपरखारी) येथे राजु राणे यांच्या घराजवळ, इस्तारी येथे राजु यांच्या घराजवळ.
गोरेगाव तालुक्यातील कन्हारटोली/चांगोटोला येथे रमेश परसमोडे यांच्या घराजवळ, बाम्हणी येथे बाबुलाल कावळे यांच्या घराजवळ, बबईटोला येथे जगदिश नेवारे यांच्या घराजवळ, धुंदाटोला/मोहगाव येथे सुरज राऊत यांच्या घराजवळ, स्कुलटोली (सोनी) येथे रोशन भगत यांच्या घराजवळ, सलंगटोला येथे भुषण ठाकुर यांच्या घराजवळ, बाजारटोला (चोपा) येथे फुलीचंद बिजेपार यांच्या घराजवळ. अशा एकूण एकोणसाठ ठिकाणी 64 लक्ष 82 हजार 94 रुपयांमधून नविन विंधन विहिरी तयार करण्यात येणार आहे.





