28.8 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home क्रीडा राष्ट्रीय  युवा पुरस्कारासाठी  अर्ज आमंत्रित

राष्ट्रीय  युवा पुरस्कारासाठी  अर्ज आमंत्रित

0
290

भंडारा, दि. 18 – केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाने सन 2017-18 व 2018-19 या वर्षाकरीता राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी अर्ज मागविले आहेत. त्यासाठी 19 जून 2020 पर्यंत मुदत राहणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या वतीने या संदर्भात पत्रक जारी करण्यात आले असून जिल्हयातील युवकांनी आपले अर्ज सादर करावयाचे आहेत. निवड प्रक्रीयेसाठी आवश्यक असलेल्या मार्गदर्शक सूचनेसोबत अर्ज 26 जून पर्यंत क्रीडा व युवा मंत्रालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करायचे आहेत. जिल्हयातील युवकांनी 2017-18 व 2018-19 वर्षातील पुरस्कारासाठी आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.