डॉ मुहम्मद सिद्दीकीनी वाढविली गोंदियाची शान

0
6

गोंदिया-येथील रहिवासी असलेला डॉ.मुहम्मद आमिर सिद्दीकी यांने अखिल भारतीय स्तरावर ७२९ व्या रँकवर उत्तीर्ण होऊन गोंदियाची शान वाढविली आहे. डॉ. सिद्धीकी यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण गोंदियातील गुजराती शाळेतून तर बारावी महावीर मारवाडी शाळेतून केले. प्राथमिक शिक्षण त्याचे आमगाव तालुक्यातील रिसामा जिल्हा परिषद शाळेत झाले आहे. अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २00७ मध्ये एमबीबीएस पदवी प्राप्त केली. एमडीची तयारी सुरू असतानाच त्यांचे मन स्पर्धा परीक्षेकडे वळले. त्यामुळे २0१२ मध्ये त्यांनी दिल्लीची वाट धरली.तिथे अभ्यास करुन त्याने पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले.त्याचा यशाने गोंदिया जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.