चर्मकार समाजात युपीएससी उत्तीर्ण करणारी जिल्ह्यातील पहिली विद्यार्थीनी

0
5

गोंदिया : जिद्द व चिकाटीच्या बळावर ध्येय गाठणे अवघड नाही, हे गोरेगाव येथील (Kajal Chavan) काजल आनंद चव्हाण हिने युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून दाखवून दिले आहे. काजल चव्हाण या विद्यार्थिनीने ७५३ वी रँक प्राप्त करीत (UPSC)  युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. विशेष म्हणजे, चर्मकार समाजातील जिल्ह्यातील युपीएससी उत्तीर्ण करणारी पहिली विद्यार्थीनी आहे.

स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मोठे पद प्राप्त करण्याचे ध्येय ठेवून विद्यार्थिनी (Kajal Chavan) काजल आनंद चव्हाण हिने परिश्रम घेतले. काजलचे वडील व्यवसायिक असून आजोबा बी.टी.चव्हाण हे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख तर मोठे वडील कमल चव्हाण हे सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत पदवीधर शिक्षक आहेत. काजल ही प्रशासकीय सेवेत जावे, अशी तिच्या आजोबांची इच्छा होती. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी काजलने अथक परिश्रम घेत पहिल्याच प्रयत्नात (UPSC) युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. परीक्षेत (Kajal Chavan) काजल चव्हाणला ७५३ वी रँक प्राप्त झाली आहे. काजलच्या यशाचे इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार असून, गोरेगाव तालुक्यासह जिल्ह्यात काजलचे कौतुक होत आहे.

काजल चव्हाण (Kajal Chavan) हिने गोंदिया येथील एका खासगी शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. यानंतर गोरेगाव येथील शहिद जान्या तिम्या जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयातून ११ व १२ वीचे शिक्षण घेतले. यानंतर जगत महाविद्यालयात विज्ञान व कला शाखेत पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून दिल्ली येथे यूपीएससीची पुर्वपरिक्षेची तयारी केली. ऑनलाइन अभ्यास करून (UPSC) युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. यासाठी तिला जगत महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक वर्गाचे तिला वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.