गोंदिया पोलीस अधिक्षकपदी भुजबळ यांची नियुक्ती

0
7
गोंदिया-महाराष्ट्र सरकारच्या गृहविभागाने बुधवारला केलेल्या बदल्यामध्ये गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक शशीकुमार मीणा यांची बदली केली आहे.मीणा यांच्याविरुध्द पोलीस प्रशासनातच नव्हे तर राजकीय नेत्यामध्ये सुध्दा चांगलीच नाराजी होती.त्यांच्या जागेवर सांगली येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य  दिलीप भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मीणा यांच्या कार्यकाळात गोंदिया शहरात मोठ्या प्रमाणात गु्न्हेगारीच्या घटना घडल्या होत्या.तसेच त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशीही चांगले संबध ठेवले नव्हते.प्रसारमाध्यमांच्या पत्रकारांना माहिती देऊ नये असा अलिखीत फतवाच त्यांनी प्रत्येक पोलीस ठाण्याला देऊन ठेवला होता.त्यामुळे त्यांच्याबद्दल पत्रकारातही मोठी नाराजी होती.