सुर्वण महोत्सवी वर्षात आयएसओ ठरली गोरेगाव पंचायत समिती

0
15

नागपूर विभागात आयएसओ व वेबसाईट सुरु करणारी पहिली पंचायत समिती

खेमेंद्र कटरे
गोंदिया berartimes.com दि 23-: राज्य सरकारने राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत पंचायत समिती, जिल्हा परिषदांसह ग्राम पंचायतीच्या बळकटीकरणावर भर दिला आहे. सोबतच प्रशासकीय कार्यालये डिजिटल करुन ई-कामकाजाला महत्व दिले आहे. या सर्व उद्देशाना हेरुनच गोंदिया जिल्हा परिषदे अंतर्गत येणाèया गोरेगाव पंचायत समितीने सुवर्ण महोत्सवी वर्षात आपली वाटचाल सुरु केली आहे. गोंदिया जिल्ह्यातच नव्हे तर नागपूर विभागात आएसओ ९००१-२०१५ हा प्रमाणपत्र मिळवून घेणारी व स्वतःची बेवसाईट तयार करणारी गोरेगाव पंचायत समिती पहिली ठरली आहे.१३ सप्टेंबर १९६७ ला उदघाटन झालेल्या या पंचायत समितीने २०१७ मध्ये ५० व्या वर्षात पदापर्ण केले आहे,हे विशेष.
विशेष म्हणजे आएसओचे नियम मार्गदर्शक तत्वे आणि त्याची निट अंमलबजावणी कसी करता येईल यावर सहाय्यक गटविकास अधिकारी संताजी पाटील यांची भूमिका खुप महत्वाची ठरलीच नव्हे तर यासाठी त्यांनी घेतलेल्या सक्रिय पुढाकारामुळेच गोरेगाव पंचायत समितीला आएओचा दर्जा मिळाला असे म्हणने ही वावगे होणार नाही. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे, सभापती दिलीप चौधरी, उपसभापती सुरेश बिसेन, अधीक्षक पी.जी.शहारे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व अधिकाèयांनी कार्यालयीन कामकाजासह परिसर सुंदर, स्वच्छ व पारदर्शक राहील यासाठी घेतलेल्या मेहनतीने पंचायत समिती प्रशासकीय इमारतीसह परिसराचा चेहरा-मोहराच बदलला गेला आहे. विविध विभागाचे कागदपत्र जे इतरत्र पडून रहायचे त्या कागदपत्रांना निट करुन अभिलेखागार कक्ष तयार करुन विभागनीय माहितीचे गड्ढे ठेवल्याने कागदपत्रांची शŸोधाशोधीचा वेळ वाचला आहे. परिसरात वृक्षारोपणासह बगीचा आणि तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रत्येक नागरिकाच्या घरी शौचालय कसे असावे याचे प्रात्याक्षीक दाखविणाèया शौचालयाची मांडणी परिसरात जनतेसाठी उपलब्ध करुन दिली गेली आहे.