काश्मीरमध्ये स्फोटात 12 जवान जखमी

0
17

वृत्तसंस्था

श्रीनगर दि. २९ – दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आज (शनिवार) सकाळी लष्कराच्या छावणीमध्ये अनावधनाने झालेल्या स्फोटात 12 जवान जखमी झाले आहेत.
लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा भागात कोर बॅटल स्कुलमध्ये लष्कराची छावणी आहे. या छावणीमध्ये आज झालेल्या स्फोटात 12 जवान जखमी झाले आहेत. त्यातील 7 जणांचा प्रकृती गंभीर असून, त्यांना बदामीबाग कॅन्टोन्मेंट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
छावणीमध्ये हा स्फोट नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला हे सांगणे कठीण आहे. पण, अनावधनाने हा स्फोट झाला असून, लवकरच चौकशी करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.