राज्यातील पत्रकारांना ‘फ्रंटलाईन वर्कर्स’चा दर्जा देऊन त्यांचे तातडीने लसीकरण करण्याची पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

0
20

मुंबई, दि. १२ : राज्यातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी यांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा द्यावा व त्यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात श्री.पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विनंती केली आहे.

मार्च २०२० पासून देशभरात कोविड-१९ या विषाणूचा संसर्ग आहे. कोविड-१९ चा संसर्ग वाढत असताना राज्यातील आरोग्य कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच विविध वृत्तपत्रांचे पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे वार्ताहर व प्रतिनिधी हे देखील बातम्यांच्या वृत्तांकनासाठी कार्यरत असतात. प्रत्येक जिल्हा, तालुका व गावाची
कोविड-१९ च्या संसर्गाबाबतची सद्यस्थिती विविध माध्यमाद्वारे शासनास अवगत करण्याचे काम करत असतात. त्यामुळे ज्याप्रमाणे देशातील इतर काही राज्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे, त्याप्रमाणे आपणही आपल्या राज्यात पत्रकार व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी यांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन त्यांना तातडीने कोविड प्रतिबंधक लस देण्यात यावी, अशी विनंती मंत्री श्री.पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.