35.5 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home Top News एकनाथ खडसेंवर ईडीची मोठी कारवाई; 5 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता जप्त

एकनाथ खडसेंवर ईडीची मोठी कारवाई; 5 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता जप्त

0
98

blank

मुंबई,दि.27ः राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. खडसे यांची 5 कोटी 73 लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. ईडीने खडसे यांची लोणावळा, जळगाव येथील मालमत्ता जप्त केल्याची माहिती मिळत आहे. मनी लॉंडरिंग प्रकरणात एकनाथ खडसेंची चौकशी केली जात असतानाच ही कारवाई ईडीकडून करण्याती आली.

भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. खडसे यांच्या जावयाला ईडीकडून करण्यात आलेली असून, सध्या त्यांची चौकशी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी खडसेंसंदर्भातील झोटिंग समितीचा गोपनीय अहवाल मंत्रालयातून गायब झाल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. दरम्यान हा अहवाल सापडला असून या अहवालात एकनाथ खडसेंनी पदाचा गैरवापर केल्याचे म्हटले होते.