काश्मीरमध्ये जोरदार हिमवृष्टी

0
14
वृत्तसंस्था
श्रीनगर दि. १२ जम्मू-काश्मीरमध्ये हिमवृष्टी, पाऊस आणि भूस्खलनामुळे राज्याचा देशाबरोबरचा संपर्क तुटला आहे. शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी याठिकाणी जोरदार हिमवृष्टी झाली. जम्मू – श्रीनगर हायवे बंद करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या एका अधिकाऱ्याच्या मते शनिवारी सकाळपर्यंत जवाहर टनलवर 8 इंच बर्फ साचला होता.
हायवेवरील वाहतूक बंद 
ऊधमपूरच्या खिरी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. तसेच हिमवृष्टीही झाल्याने याठिकाणी भूस्खलन झाले. त्यामुळे जम्मू-श्रीनगर हायवेवरील वाहतूक बंद करावी लागली.
गुरुवारपासून स्थिती गंभीर 
– मोठया प्रमाणावर बर्फ पडत असल्याने गुरुवारी श्रीनगर लेह, मुघल रोड आणि सोनमर्ग-गुलमर्ग रोड बंद झाला होता.
– शुक्रवारी रात्रीपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद होती.
– श्रीनगरहून येणार्या गाड्या जवाहर टनलपूर्वीच थांबवण्यात येत आहेत. तर जम्मूहून गाड्यांना पुढे सोडलेच जात नाही आहे. हायवेवर वाहतुकीची कोंडी झाली आहे.
– शुक्रवारी सायंकाळपर्यंत काश्मीरच्या काही भागांमध्ये हिमवर्षाव सुरू होता. हवामान विभागानुसार पुढचे एक-दोन दिवस हवामान खराब राहण्याची शक्यता आहे.
– राज्याच्या काही भागांमध्ये शनिवारी सकाळी पाऊस झाल्याचे वृत्त आहे