‘पर्सन ऑफ दी इयर’च्या यादीत मोदींची घसरण

0
18

जगप्रसिद्ध टाईम्स मॅगॅझिनने सादर केलेल्या ‘पर्सन ऑफ दी इयर’ यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्थानात घसरण झाली असून ते दुस-या स्थानी आले आहेत.
वॉशिंग्टन (पीटीआय)– जगप्रसिद्ध टाईम्स मॅगॅझिनने सादर केलेल्या ‘पर्सन ऑफ दी इयर’ यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्थानात घसरण झाली. मोदी हे दुस-या स्थानी आले आहेत. फर्ग्युसन येथील आंदोलक या यादीत अव्वल स्थानी आहेत.
दिलेल्या मतानुसार ९.८ टक्के मतांसह मोदी दुस-या स्थानी आहेत तर फर्ग्युसन येथील आंदोलक १०.८ टक्के मतांसह अव्वल स्थानी आहेत.
हाँगकाँगचे जोशू वोंग हे तिस-या स्थानी आहे तर नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफजाई(५.३टक्के) चौथ्या आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन पाचव्या स्थानी आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा या यादीत केवळ २.४ टक्के मतांसह अकराव्या स्थानी आहेत.
२६ नोव्हेंबरपर्यंत मोदी या यादीत ११.१ टक्के मतांसह पहिल्या स्थानावर होते. तर फर्ग्युसन आंदोलक ८.८ टक्के मतांसह दुस-या स्थानावर होते.