अंबानी, अदानींची मुले देणार सरकारला आर्थिक सल्ला:एन. चंद्रशेखर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

0
15

मुंबई-महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्स करण्यासाठी आर्थिक सल्लागार समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केली होती. त्यानंतर लगोलग शुक्रवारी या समितीची नेमणूक करून त्याचा जीआरही जारी करण्यात आला. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत २१ उद्योजक व तज्ज्ञांचा समावेश आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी व गौतम अदानी यांच्या पुत्रांचाही त्यात समावेश आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे २७ वर्षीय संचालक अनंत मुकेश अंबानी हे ऊर्जा क्षेत्राबाबत तर अदानी पोर्टचे ३५ वर्षीय सीईओ करण गौतम अदानी हे बंदरे व विशेष आर्थिक क्षेत्र विकासाबाबत शिंदे – फडणवीस सरकारला सल्ला देतील.

औरंगाबादच्या बडवेंना स्थान
संजीव मेहता (एचयूएल), अमित चंद्रा, श्रीकांत बडवे (बडवे इंजिनिअरिंग), अजित रानडे (गोखले संस्था), अनीश शहा (महिंद्रा ग्रुप), बी.के. गोयंका (वेलस्पून), मिलिंद कांबळे (डिक्की), विलास शिंदे (सह्याद्री फार्म्स) प्रसन्ना देशपांडे (चैतन्य बायोटेक बुलडाणा), उद्योग विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे यांचाही समितीत समावेश आहे.