बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले:आम्ही राजदसोबत गेलो तेव्हा, संस्था लालूंच्या मागे लागल्या

0
4

पाटणा-बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, आम्ही आधी राजदसोबत गेलो तेव्हा केंद्रीय तपास संस्था लालू कुटुंबीयांच्या मागे लागल्या होत्या. ५ वर्षे शांततेत गेली. आता पुन्हा राजदसोबत आलो असता तसेच घडत आहे. मुख्यमंत्री, बुधवारी माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले केंद्रात कोणतेच काम होत नाही. केवळ प्रचार होत आहे. राहुल गांधी प्रकरणावर त्यांनी कोणतीच टिप्पणी दिली नाही.

कोर्टाच्या प्रकरणात आम्ही कधीच बोलत नाही. एखाद्यावर खटला दाखल झाला तरी आम्ही कमेंट देत नाही. आम्ही मागील १७ वर्षांपासून सरकारमध्ये आहोत. कोणत्याही तपासात आम्ही हस्तक्षेप करत नाही. केंद्राबाबत नितीश म्हणाले, आम्ही आधीच्या केंद्र सरकारचे कौतुक करतो. पण हे केवळ आपल्याच सरकारचे कौतुक करतात.