तीन कंटेनरमधून 570 कोटी रुपये जप्त

0
12
वृत्तसंस्था

कोईम्बतूर – तमिळनाडूमधील तिरुपुर जिल्ह्यात आज (शनिवार) सकाळी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या तपासणीदरम्यान  570 कोटी रुपयांनी भरलेले तीन कंटेनर जप्त करण्यात आले आहेत. हे नोटांनी भरलेले कंटेनर कोणाचे आहेत आणि ते कुठे चालले याची चौकशी सुरु असून या रकमेचा वापर राजकीय पक्ष निवडणुकीत करणार होता का, या प्रश्नांचे उत्तर आयोगाच्या अधिकाऱ्यांनी अजून दिले नाही.तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी 16 मे रोजी मतदान होणार आहे. त्याआधी तिरुपूर जिल्ह्यात शनिवारी पहाटे निवडणूक आयोगाच्या टीमने तीन कंटेनरमध्ये 570 कोटी रुपये रोख जप्त केले आहेत. शनिवारी पहाटे तिरुपूर जिल्ह्यातील चेंगापल्ली येथील नाक्यावर निवडणूक आयोगाचे भरारी पथक वाहनांची तपासणी करत होते.  यावेळी तेथून तीन कंटेनर वेगात गेले. अधिकाऱ्यांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला होता. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष्य करत ट्रकचा वेग आणखी वाढवला.  अधिकारी आणि पोलिस पथकाने त्यांचा पाठलाग करुन तिन्ही कंटेनर पकडले.