भारतीय बनावटीच्या पहिल्या ‘स्पेस शटल’चे यशस्वी प्रक्षेपण

0
15

यूएनआय

चेन्नई- अंतराळ यान प्रक्षेपण अाणि मंगळ यान माेहिमेच्या यशस्वीतेनंतर भारतीय अंतराळ संशाेधन संस्था (इस्त्राे) देशाच्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या फेरवापर याेग्य अंतराळ यानचे (स्पेस शटल) यशस्वी प्रक्षेपण केले आहे. श्रीहरीकाेटा येथील सतीश धवन अवकाशतळावर अाज (दि.23) सकाळी सात वाजता ‘स्पेस शटल’ उड्डाण यशस्वी घेतले.

या यशस्वी मोहिमेमुळे भारत ‘स्पेसएक्स’चे ‘फाल्कन 9’ अाणि ‘ब्लू अाेरिजिन’च्या ‘न्यू शेफर्ड राॅकेट’ च्या पंक्तीत स्थान मिळवणार आहे. यासोबतच अमेरिकन अंतराळ संशाेधन संस्थेनंतर (नासा) हे तंत्रज्ञान विकसीत करणाऱ्या देशांच्या पंक्तीतही भारताला स्थान मिळणार अाहे. उपग्रह प्रक्षेपणासाठी येणारा खर्च कमी करणे, हा त्यामागील प्रमुख हेतू अाहे.

या मोहिनेचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून इस्रोने ‘आरएलव्ही-टीडी’ हे यान तयार आहे. भारतीय बनावटीच्या पहिल्या स्पेस शटलचे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ‘इस्रो’चे अभिनंदन केले आहे. भारताची ही चाचणी यशस्वी झाली, तर एअर ब्रीदिंग प्राेपल्शन सिस्टिमचा (एबीपीएस) वापर करून केलेला हा प्रयाेग अंतराळ उड्डाण क्षेत्रात जागतिक पातळीवर एक क्रांतीकारी पाऊल ठरेल. त्याचा व्यावसायिक वापर करून ‘इस्त्राे’ला ‘नासा’शी सहज स्पर्धा करता येईल.