जयललितांचा आज शपथविधी

0
5

यूएनआय

चेन्नई – अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जे. जयललिता विक्रमी सहाव्यांदा तमिळनाडूच्या मुख्यमंत्री बनणार असून, आज (सोमवारी) होणाऱ्या शपथविधी कार्यक्रमाची सर्व जय्यत तयारी झाली आहे. राज्यपाल डॉ. के. रोसैया मद्रास विद्यापीठ परिसरात होणाऱ्या कार्यक्रमात जयललिता आणि त्यांच्या 28 कॅबिनेट मंत्र्यांना शपथ देतील. मंत्रिमंडळात जुन्या आणि नव्या चेहऱ्यांचे मिश्रण असून, यामध्ये मुख्यमंत्रिपदासह चार महिलांचा समावेश आहे. मंत्रिमंडळात 13 नवे चेहरे असतील.