बांग्लादेशमध्ये नमाजादरम्यान बॉम्बस्फोट, १ ठार ५ जखमी

0
11

युएनआय
ढाका, दि. ७ – ढाका येथील रेस्टॉरंटमध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार करत केलेल्या नृशंस हत्याकांडाला आठवडाही उलटत नाहीत तोच बांग्लादेश पुन्हा बॉम्बस्फोटाने हादरला. ढाक्यापासून १०० किमी अंतरावर असलेल्या किशोरगंज येथे गुरूवारी सकाळी ईदनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नमाजादरम्यानच बॉम्बस्फोट झाला आणि १ पोलीस शहीद तर ५ जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी हा स्फोट घडवला असून पोलिस व दहशतवाद्यांदरम्यान चकमक सुरू आहे.