तर भारत पूर्णपणे तयार;केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले स्पष्ट
नवी दिल्ली:-चीनमध्ये झपाट्याने पसरणाऱ्या एचएमपीव्ही व्हायरसने दहशत निर्माण केली आहे. कोरोनासारखी महामारी पसरू नये, यासाठी जगभरातील देश सतर्क झाले आहेत. या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारत देखील सतर्क झाला आहे. भारताचीही या व्हायरसच्या रुग्णावर नजर आहे. भारत सरकार या व्हायरसचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी म्हटले की, चीनमध्ये श्वसनाच्या आजारांच्या प्रकरणांमध्ये अलीकडे वाढ होत आहे. त्यामुळे काळजी करण्याची परिस्थिती आहे. यामध्ये मानवी मेटापन्यूमोव्हायरसमुळे होणारे रोगदेखील समाविष्ट आहेत. भारताच्या आरोग्य मंत्रालयाने त्यानंतर एका निवेदनात मंत्रालयाने जोर दिला की चीनमध्ये सर्व काही ठीक आहे. भारत श्वसन संक्रमणाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.
आरोग्य मंत्रालयाने चीनमधील परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी बैठक घेतली. त्यानंतर आरोग्य मंत्रालयाने म्हटले कि, कोणत्याही संभाव्य धोक्यांबद्दल जागरूक राहण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थासोबत सहकार्य सुरु आहे. एचएमपीव्हीसारखे विषाणू भारतात आधीपासूनच प्रचलित आहेत आणि विद्यमान आरोग्य पायाभूत सुविधा कोणत्याही संभाव्य प्रकरणांना हाताळण्यास सक्षम आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, भारताकडे यंत्रणा तयार आहे. देशातील आरोग्य सेवा संसाधने श्वसनाच्या आजारांना तोंड देण्यासाठी सुसज्ज आहेत. तसेच नागरिकांना काळजी न करण्याचे आवाहन केले आहे.