स्फोटात आठ कामगारांचा मृत्यू, प्रशासनाकडून चार जणांची नावे जाहीर,विद्यार्थ्यांचा मृत्यू

0
650

भंडारा,दि.२४ः- जिल्ह्यातील जवाहर नगर आयुध निर्माणीतील स्फोटात आठ कामगार मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये दिली. मात्र दुपारी चार वाजता भंडारा जिल्हा प्रशासनाने चार मृतकांची नावे जाहीर केली आहेत.भंडारा जिल्ह्यातील जवाहर नगर परिसरात गावकरी सांगतात स्फोट इतका भीषण होता की दुर्घटनेनंतर बिल्डिंगचे पत्रे सुमारे पाचशे ते सातशे मीटर अंतरावर जाऊन पडलेत. साडेदहा ते पावणे अकराच्या दरम्यान हा स्फोट झाला. दुर्घटनेनंतर दोन कामगारांचा मृतदेह बाहेर काढण्यात आले . तर सध्या बचाव कार्य सुरू आहे. मृतांचा आकडा आठवर पोहचल्याची माहिती आहे. ज्या ठिकाणी स्फोट झाला तेव्हा तेथे एकूण १४ कामगार काम करीत होते . सात कामगार मलब्याखाली दबून असल्याची भीती वर्तविण्यात येत आहे. सध्या त्यांचा शोध घेण्यासाठी ऑर्डनन्स फॅक्टरी युद्धस्तरावर काम करीत आहे.

भंडा-याजवळील जवाहर नगर आयुध निर्माणीत सकाळी १० वा स्फोट झाला. तेंव्हापासून या दुर्घटनेत किती कामगार दगावले याची अधिकृत माहिती प्रशासनाकडून जाहीर केली नव्हती. त्यामुळे वेगळे आकडे सांगितले जात होते. नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात भंडारा प्रशासनाशी संपर्क साधून दुर्घटनेत आठ कामगारांचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास भंडारा जिल्हा प्रशासनाने चार मृत कामगारांची तसेच जखमींची यादी जाहीर केली.
मृत कामगार
१)चंद्रशेखर गोस्वामी (५९ वर्षे )
२) मनोज मेश्राम (५५ वर्षे )
३)अजय नागदेवे (५१ वर्षे )
४)अंकित बारई (२० वर्षे )
जखमींची नावे
१)एन पी वंजारी (५५ वर्षे )
२)संजय राऊत( ५१ वर्ष )
३) राजेश बडवाईक (३३ वर्षे )
४) सुनील कुमार यादव( २४ वर्षे )
५) जयदीप बॅनर्जी (४२ वर्षे )

जेथे स्फोट झाला तेथील मलबा उपसण्याचे काम सुरू असून सात ते आठ कामगार दबले असण्याची भीती व्यक्त केली जात आहेजवाहरनगर आयुध निर्माणीत स्फोट;मोठी जीवितहानी?

जवाहर नगर आयुध निर्माणीतील स्फोटात कारखान्यात प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला. कारखान्यातील मलब्याखाली अनेक कामगार दबले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. यात एका प्रशिक्षणार्थी कामगाराचा मृतदेह सापडला आहे. अंकित बारई , वय २२, साहुली असे त्याचे नाव असून तो आर्ट अँड कॉमर्स महाविद्यालय ठाणा येथील बी.कॉम. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे.घटनास्थळी बचाव पथकाचे काम युद्धस्तरावर सुरू आहे.आधी घटनास्थळी दोन जेसीबी होत्या आता आणखी दोन अशा ४ जेसीबी मलबा काढण्याचे काम करत आहे. जिल्ह्यातून १०२ रुग्णवाहिका जवळपास १५ ते २० पाचारण करण्यात आल्या आहेत. अधिकृतपणे या अपघातात किती कामगार दगावले हे जाहीर करण्यात आले नाही. मात्र जीवितहानी मोठी असल्याची चर्चा आहे.