पोलिसांनी चौकशीसाठी आरोपीच्या भावाला घेतले ताब्यात
पुणे :- पुण्यातील अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. पुण्यातील शिवशाही बसमधील तरुणीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर एकच संताप व्यक्त केला जात आहे.शिवशाही बसमध्ये झालेल्या संतापजनक घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई सुरु केली आहे. पुणे पोलिसांचे पथक आरोपीच्या घरी देखील पोहोचले आहेत. दत्तात्रय गाडे असे आरोपीचे नाव आहे. आता या नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याचा फोटो समोर आला आहे.दरम्यान पोलिसांनी चौकशीसाठी आरोपीच्या भावाला ताब्यात घेतले आहे.आरोपीचा तपास करण्यासाठी पुणे पोलिसांनी त्याच्या भावाला शिरूर येथील त्याच्या राहत्या गावातून चौकशीसाठी घेतलं ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आठ टीम कडून आरोपीचा शोध सुरु आहे.
स्वारगेट एसटी स्टँडमध्ये घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार आहे. या अगोदर दत्तात्रयवर शिरुर पोलिस स्थानकात चोरीचे, साखळी चोरल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. सराईत गुन्हेगार हा स्वारगेट स्थानकात वावरत होता.पुण्यातील शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. २६ वर्षीय तरुणीवर बुधवारी पहाटे स्वारगेट एस टी डेपोमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील एसटी डेपोवर बुधवारी पहाटे ५.३० वाजता ही घटना घडली आहे. संतापजनक घटनेनंतर पोलिसांचे पथके आरोपीच्या मागावर आहेत.तर बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपीची ओळख पटवली आहे.
पुणे पोलिसांकडून आरोपी दत्तात्रय गाडे याच्या भावाला ताब्यात घेण्यात आलं आहे. पुणे पोलिसांचे पथक आरोपी दत्तात्रय गाडेच्या घरी दाखल झालं आहे. मात्र, आरोपी गाडे घरी नसून फरार आहे. पुणे पोलिसांनी गाडे याच्या शिरुर येथील घरावर छापा मारला आहे. गाडे याच्यावर पुण्यासह शिरूरमध्ये सुद्धा चोरी, हाणामारीचे गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथके सुद्धा शोध घेत आहेत. आरोपी गाडे याचा फोटोही समोर आला आहे.
कोण आहे दत्तात्रय गाडे ?
पुण्यात शिवशाही बसमध्ये महिलेवर बलात्कार करणाऱ्या नराधामाचं नाव दत्तात्रय गाडे आहे. दत्ता गाडे हा पुण्यातील सराईत गुन्हेगार आहेत. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्यावर धमकी देणे, चेन स्नॅचिंग या सारखे गंभीर गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत. दत्ता गाडे हा मूळचा शिरूरमधील आहे. त्याच्याविरोधात शिक्रापूर आणि शिरुर पोलिसांत नोंद आहेत. आरोपी दत्ता गाडे फरार आहे.
पोलिसांचे आवाहन
*पोलिसांनी फोटो प्रसिद्ध केले असून सर्व पोलिस स्थानकात फोटो पाठवले आहेत. तसेच हा नराधम आरोपी कुठे दिसला किंवा याविषयी कोणतीही माहिती असेल तर नागरिकांनी तात्काळ पोलिसांना संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नेमकं काय घडलं?
*तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस डेपोत आली होती. या पीडित तरुणीने आरोपीला फलटणला जाणाऱ्या बसबाबत विचारणा केली. याच प्रश्नाने तिचा घात झाला. आरोपी दत्तात्रय गाडे याने तिचा गैरफायदा घेतला. आरोपीने तिची बस दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचे सांगितले. आरोपीने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिला विश्वासात घेतले आणि जवळ उभ्या असलेल्या एका बंद शिवशाही बसकडे घेऊन गेला. बस बंद असल्याचे लक्षात आल्यानंतरही आरोपीने तिला आत जाण्यास सांगितले आणि स्वतःही बसमध्ये घुसला. त्यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्ती केली आणि लगेचच तिथून फरार झाला असल्याची माहिती समोर आली आहे.