जिल्हाधिवेशन व भव्य शिक्षण परिषद प्रेरणा कार्यशाळा उत्साहात

0
47

शिक्षक समितीच्या जिल्हाधिवेशनात हजारो शिक्षकांची उपस्थिती

गोंदिया,दि.२६ः- विद्यार्थी ,समाज व शिक्षकांसाठी लढणारी अग्रणी संघटना म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ज्या शिक्षक संघटनेची ओळख आहे अशा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा अधिवेशन गोंदिया येथे संथागार सभागृहात उत्साहात संपन्न झाले. यावेळी हजारोच्या संख्येने शिक्षक बंधू भगिनी अधिवेशनाला उपस्थित होते. संचमान्यता संदर्भातील शासन निर्णय मागे घेण्यास व शिक्षण सेवक पद रद्द करण्यास शासनाला भाग पाडू असे मत आमदार विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केले.
अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्याध्यक्ष विजय कोंबे तर उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर उपस्थित होते. प्रामुख्याने जिल्हा अधिवेशनाला गोंदिया निर्वाचन क्षेत्राचे विधानसभा सदस्य आदरणीय विनोद अग्रवाल, सोबतच जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे,जिल्हा परिषद सभापती लक्ष्मण भगत , जिल्हा परिषद सभापती पौर्णिमाताई ढेंगे , जिल्हा परिषद सदस्य चंद्रकलाताई डोंगरवार ,उपसभापती शालिकरामजी कापगते राज्य कार्यकारिणी सदस्य नरेंद्र गाडेकर, जिल्हाध्यक्ष भंडारा शिक्षक समिती श्रीधर काकीरवार, आचल दामले उपस्थित होते.सर्वप्रथम जिल्ह्यातील नामांकित अशा दोन शाळांचा सन्मान शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आला… प्रामुख्याने देवरी पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भागी शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र अमृतकर यांनी शाळेला उंचावर नेण्यासाठी जी मेहनत घेतली व 32 पटसंख्यावरून शाळा 300 च्या घरामध्ये नेण्याचा जो पराक्रम केला, त्या संदर्भातील माहिती उपस्थित सर्व शिक्षक बांधवांसमोर विशद केली सोबतच खर्रा शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र गौतम यांनी सुद्धा अतिशय आदिवासीबहुल ओळखल्या जाणाऱ्या खर्रा येथे शाळेच्या विकासाचा आलेख कशा पद्धतीने उंचावला याची सुद्धा सविस्तर माहिती दिली. सोबतच ज्या पाच कवितासंग्रहाची नोंद गिनीज वर्ड बुक मध्ये करण्यात आली अशा सुप्रसिद्ध कवी मुरलीधर खोटले यांच्या संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

प्रास्ताविकामधून जिल्हाध्यक्ष संदीप तिडके यांनी जिल्ह्यातील शिक्षकांच्या समस्या सोबतच शाळा व विद्यार्थी टिकवण्याचे महा संकट आले असून 15 मार्च 2024 ला निर्गमित झालेला शासन निर्णय तत्काळ शासनाने रद्द करावा व राज्यातील हजारो शिक्षक जे शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे अतिरिक्त झाले व होतील, त्यांना न्याय द्यावा ही मागणी अधिवेशनात प्रामुख्याने ठेवली… सोबतच नव्याने लागलेल्या शिक्षक बांधवांचा सेवेचा कालावधी हा अतिशय अल्प असल्यामुळे 2000 साली सुरू केलेली शिक्षण सेवक योजना रद्द करून, पूर्ण वेतनावर शिक्षकांना नेमणूक करण्यात यावी यासंदर्भात उपस्थित सर्व पदाधिकारी महोदयांचे लक्ष वेधले. सोबतच शिक्षक व विद्यार्थी हिताच्या अनेक मागण्या अधिवेशनात ठेवण्यात आल्या.यावेळी गोंदिया निर्वाचन क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांनी आपल्या मनोगतातून शिक्षक समितीचे कार्य प्रेरणादायी असून येणाऱ्या 28 तारखेला शिक्षक समितीच्या निवेदनानुसार आपण सर्व विभागाची समस्या निवारण बैठक आयोजित केलेली असल्याचे सांगितले सोबतच जे अन्यायकारक शासन निर्णय काढण्यात आले ज्यामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त होत आहेत असे शासन निर्णय मागे घेण्यासाठी व शिक्षण सेवक योजना रद्द करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक लायकराम भेंडारकर यांनी आपल्या मनोगतामधून शिक्षक समितीचे कार्य विद्यार्थी व समाज हिताचे असून संघटनेच्या प्रत्येक वाटचालीस शुभेच्छा देत संघटनेने प्रामुख्याने ठेवलेली मागणी सकाळ पाळीत शाळेची वेळ बदलवणे या संदर्भात सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे संचालन स्नेहा रामटेके व आशिष दुबे यांनी अतिशय सुरेखपणे केले व कार्यक्रमाचे आभार महिला जिल्हाध्यक्ष ममता येडे मॅडम व जिल्हासरचिटणीस संदिप मेश्राम यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप तिडके, विभागीय अध्यक्ष किशोर डोंगरवार, जिल्हा नेते सुरेश रहांगडाले, सरचिटणीस संदिप मेश्राम, राज्य कार्यकारणी सदस्य शरद पटले, उपाध्यक्ष एच. एस.बिसेन, महिलाध्यक्ष ममता येडे , सरचिटणीस प्रतीमा खोब्रागडे, गौतम बांते,मुकेश रहांगडाले कार्याध्यक्ष,विनोद बडोले कार्याध्यक्ष,दिलीप नवखरे,उत्तम टेंभरे ,बी एस केसाळे ,कृष्णा कहालकर,दिनेश उके,राज कडव ,अशोक बिसेन, शोभेलाल ठाकूर,दिलीप लोदी, उमेश रहांगडाले ,सतीश दमाहे ,राजेंद्र बोपचे, सौ भारती तिडके यु.जी. हरीणखेडे, संजय बोपचे, के.जी रहांगडाले, गजानन पाटणकर, पूर्णानंद ढेकवार, दिनेश बिसेन, जीवन म्हशाखेत्री, आशिष कापगते,अनिल वट्टी, विलास डोंगरे, सुरेंद्र मेंढे, मिथुन चव्हाण, सेवकराम रहांगडाले, रतन गणवीर, रेवानंद उईके , विजेंद्र केवट,मीनाक्षी पंधरे, कु.स्नेहा रामटेके, सौ उत्तरा परदे, कु. सपना शामकुवर, कु. प्रेमलता बघेले, वंदना झो, देवीकिरण शहारे, कु.गीता लांडेकर, कु. रीता राऊत ,सौ खेमलता मोरघडे, मा उषा पारधी, मा. प्रिया बोरकर, कु. हिना बोपचे, कु. शारदा अंबादे, कु.मंजुश्री लढी, सुप्रिया तांदळे, कु. वनिता झोडे यासह समस्त जिल्हा कार्यकारिणी व आठही तालुका कार्यकारिणी यांनी अथक परिश्रम घेतले