म्यानमार, इटली, चीन, बंगलादेश पाठोपाठ भारताच्‍या 11 राज्‍यांत भूकंप

0
16

नवी दिल्ली / रोम – म्यानमार, चीन, बंगालादेश, थायलँड, व्‍हि‍यतनाम आणि इटलीसह भारतातील 11 राज्‍यांतील अनेक शहरांमध्‍ये आज (बुधवारी) भूकंप झाला. भूकंपामुळे सेंट्रल इटलीतील पेरुगिया प‍रिसरातील जवळपास 5 शहरांना शेकडो लोक बेघर झाले असून, 38 जण मृत्‍यूमुखी पडलेत. दरम्‍यान, भारतात गुवाहटी, कोलकाता आणि पाटण्‍यासह इतर अनेक शहरांतही हे झटके जाणवले. त्‍याची तीव्रता 6.2 रिक्टर सांगितली जात आहे.
इटलीत मोठे नुकसान
इटलीमुळे भूकंपामुळे मोठे नुकसान झाले. स्थानिक वेळेनुसार, बुधवारी 3 वाजून 30 मिनिटांनी हा भूकंप आला. 20 सेकंदांपर्यंत या भूकंपाचे हादरे बसले. भूकंपाचे केंद्र अंब्रियामधील नोर्शिया शहरात जमिनीखाली 10 किलोमीटर अंतरावर होते.
इटलीत 5 शहरे झाली उद्ध्‍ववस्त…
> शक्तीशाली भूकंपामुळे सेंट्रल इटलीतील एक्यूमोली, एमाट्रिस, पोस्टा, आरक्वाटा दे ट्रोन्टो आणि कारी शहराची सर्वाधिक हानी झाली आहे.
> यूनाइटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंपाचे केंद्र पेरुगिया शहरापासून 10 किलोमीटरअंतरावर होते.
> इटली सरकारने युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू केले असून, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
> दरम्यान, 2009 मध्ये इटलीत आलेल्या 6.3 तीव्रतेच्या शक्तीशाली भूकंपाने 300 लोकांचा बळी घेतला होता.
निम्यापेक्षा जास्त उद्‍धवस्त झाले एमाट्रिस शहर
> इटलीती एमाट्रिस शहराचे शहराध्यक्ष सेर्गियो पिरोजी यांनी सांगितले की, या भूकंपाने निम्म्यापेक्षा जास्त शहर उद्‍धवस्त झाले आहे. शहरात हाहाकार उडाला आहे. शेकडो लोक ढिगार्‍याखाली अडकल्याची भीतीही सेर्गिजो यांनी व्यक्त केली आहे.
> शहरातील जवळपास सर्वच रस्ते उद्‍धवस्त झाले असून शहराचा इतर शहरांशी संपर्क तुटला आहे.
म्यानमारमध्‍ये 6.8 रिक्‍टरचे झटके
भारताचा शेजारी देश म्‍यानमारमध्‍ये बुधवार सायंकाळी मोठा भूकंप झाला. त्‍याची तीव्रता 6.8 रिक्‍टर एवढी होती. मध्‍य म्‍यानमारच्‍या 84 किमी जखमीखाली त्‍याचे केंद्र होते.
भारतात कुठे झाला भूकंप
> बंगाल, बिहार, आसम, झारखंडपर्यंत या भूकंपाचे झटके जाणवले.
> कोलकाता, पाटणा, रांची, गुवाहाटीमध्‍ये जवळपास 10 सेकंद भूकंप झाला.
कोलकातामध्‍ये थांबवली मेट्रो…
> भूकंपाचे झटके जाणवल्‍यानंतर कोलकाताची मेट्रो सेवा थांबवण्‍यात आली.
> पश्चिम बंगालमध्‍ये कोलकातासह मालदा, खडगपूर, जलपाईगुडी, सिलीगुडीमध्‍ये भूकंप जाणवला.
दोन दिवसापूर्वी दिल्लीतही भूकंप
> सोमवार दुपारी दिल्‍लीमध्‍येही भूकंपाचे झटके जाणवले.
> दिल्ली शिवाय हरियाणामध्‍येही भूकंप झाला.
> त्‍याची तीव्रता केवळ 3.5 रिक्टर होती.
> हरियाणातील महेंद्रगड केंद्र होते.
याही देशांत भूकंप
> म्‍यानमार, इटली, आणि भारतासह बांगलादेश, थायलँड, व्‍हि‍यतनाम आणि चीनच्‍या काही भागांत भूकंप झाला.
म्‍यानमारमध्‍ये दोन दिवसांत दुसऱ्यांदा भूक‍ंप
> म्‍यानमारमध्‍ये दोन दिवसांत दुसऱ्यांदा भूकंप झाला.
> मंगळवारी 5.3 तीव्रतेचे झटके नोंदवले गेले होते.