‘जय’ वाघाचा तपास होणार सीआयडीमार्फत – मुख्यमंत्री

0
16

गोंदिया, दि. २७ – पाहताक्षणीच पर्यटकांना भुरळ घालणारा उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील ‘जय’ वाघ गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता असून आता त्याच्या तपासासाठी सीआयडीला पाचारण करण्यात आले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वाघाचा तपास सीआयडीकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘जय’च्या हत्येच्या संशयावरून वनविभागाच्या अधिका-यांनीभंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील दोघांना ताब्यात घेतले होते.
आशियातील सर्वात मोठा वाघ अशा ‘जय’ची ओळख असून तो गेल्या काही वर्षांपासून उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याची खास ओळख बनला होता. जंगलात ‘जय’चे दर्शन होताच पर्यटकही समाधान व्यक्त करीत होते. तो अल्पावधीतच राज्यभरात प्रसिद्ध झाला होता. त्यामुळे त्याचे दर्शन घेण्यासाठी पर्यटकांच्या या अभयारण्यात रांगा लागत होत्या.

दुसरीकडे मुख्य वनसंरक्षक एस. एम. रेड्डी यांनी स्वत: सुत्रे हातात घेत वनाधिकाऱ्यांसह जंगल पिंजुन काढला. यावेळी त्यांच्या सोबत उपमुख्य वनसंरक्षक उमेश वर्मा व अड्याळचे वनक्षेत्राधिकारी पी. जी. महेश पाठक, पवनीचे आर. एफ.ओ. दादा राऊत, भंडाराचे आर. एफ. ओ. मेश्राम, येटवाईचे पोलीस पाटील राजेश वरखेडे यांचा सहभाग होता.काटेखाये यांनी सांगितेल्या स्थानावर पुन्हा नव्याने शोध मोहिम सुरु केली. त्यात त्यांना वाघाची विष्ठा, त्याच्या शरिरावरील केस आढळले. परिसर मोठा असल्यने याठिकाणी १०० ट्रॅप कॅमेरे लावण्याचे आदेश मुख्य वनसंरक्षकांनी वनाधिकाऱ्यांना दिले.