धनगरांच्या आरक्षणासाठी राँकाचे विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन

0
14

नागपूर- निवडणुकीच्या वेळी भाजपनं धनगर आरक्षणाच्या मुद्द्याचं भांडवल केलं. सत्तेत आल्यास धनगर आरक्षणाचा विषय चुटकीसरशी सोडवू. असं भाजपचे नेते सांगत होते. मात्र सत्ता मिळाल्यानंतर त्यांना धनगर समाजाच्या आरक्षणाचा विसर पडलेला आहे. समाजाच्या फसवणुकी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार रामराव वडकुते यांनी पारंपरिक धनगर वेशात विधान भवनाच्या पायऱ्यांवर धरणं आंदोलन केलं. या आंदोलनात आमदार जयंत पाटील,भाष्कर जाधव, राणा जगजितसिंह पाटील, हसन मुश्रीफ, प्रकाश गजभिये आणि विक्रम काळेही सहभागी झाले होते.