28.2 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home Top News पेट्रोल पंपावर उद्यापर्यंतच चालणार 500ची जुनी नोट

पेट्रोल पंपावर उद्यापर्यंतच चालणार 500ची जुनी नोट

0
31

मुंबई, दि. 1 – पेट्रोल पंपावर आणि विमान तिकीटासाठी शुक्रवारपर्यंतच म्हणजे 2 डिसेंबपर्यंतच 500 ची जुनी नोट वापरता येऊ शकते. शुक्रवारपर्यंतच या ठिकाणी जुन्या नोटा स्विकारण्यात येणार आहेत. त्यानंतर या नोटा वापरणं शक्य होणार नाही आहे. याआधी 15 डिसेंबरपर्यंत नोटा स्वीकारण्याची मुभा होती, मात्र ही मुदत कमी करत 2 डिसेंबरपर्यंत करण्यात आली आहे. पेट्रोल पंपांवर जुन्या नोटासाठी कमिशन घेतले जात असल्याचे दिसून आल्यानं केंद्र सरकारने तातडीने निर्णय मागे घेतला असल्याची माहिती मिळत आहे. तसंच सरकारकडून टोल नाक्यांवर देण्यात आलेली उद्या मध्यरात्रीपासून संपुष्टात येणार आहे.