आता ३१ मार्चपर्यंत रिलायन्स जिओची मोफत ४ जी सेवा

0
15

वृत्तसंस्था मुंबई, दि. १ – रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओ ग्राहकांना गुड न्यूज दिली आहे. रिलायन्स जिओ हॅप्पी न्यू इयर ऑफरअंतर्गत रिलायन्स जिओ ग्राहकांना आता ४ जी सेवा ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे मोफत वापरता येणार आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत मुकेश अंबानी यांनी ही घोषणा केली. जिओचं कार्ड आता घरपोच मिळणार असून नंबर पोर्टेबिलीटीचा सेवाही सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं. इतर कंपन्यांनी सहकार्य न केल्याने कॉल ड्रॉप होत असल्याचं अंबानींनी सांगितलं. तसेच ग्राहक, सरकार आणि ट्रायचे त्यांनी आभार मानले. याशिवाय पंतप्रधान मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयाचं त्यांनी कौतूक केलं. फेसबुक, व्हॉट्सअॅपपेक्षाही जिओची सेवा झपाट्याने वाढत असल्याचं त्यांनी नमूद केलं. लॉन्च झाल्यापासून अवघ्या 3 महिन्यातच जिओचे 5 कोटींपेक्षा जास्त ग्राहक झाल्याचं त्यांनी सांगितलं.

यापुर्वी जिओ वेलकम ऑफर अंतर्गत ३१ डिसेंबरपर्यंत ४ जी सेवा मोफत मिळणार होती. मात्र, आता जिओ हॅप्पी न्यू इयर ऑफरअंतर्गत ३१ मार्चपर्यंत ४ जी सेवा मिळणार आहे. यामध्ये कॉलींग आणि मेसेजही मोफत असणार आहे.

ऑफरनुसार ग्राहकांना 4जी डेटा आणि मोफत कॉलची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत रिलायन्स जिओची ऑफर 31 डिसेंबर 2016 पर्यंत मर्यादित होती. मात्र, आता ती मुदत मार्च 2017पर्यंत वाढवली आहे.