23.7 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home Top News एअर इंडियाच्या इमारतीला भीषण आग

एअर इंडियाच्या इमारतीला भीषण आग

0
22

मुंबई, दि. 20 – नरिमन पॉईंट परिसरातील एअर इंडियाच्या इमारतीला आग लागली होती. इमारतीच्या 22 व्या मजल्यावर ही आग लागली होती. सकाळी पावणे सातच्या सुमारास लागलेली ही आग दीड तासानंतर आटोक्यात आली. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी उपस्थि होत्या. 22 व्या मजल्यावर आग लागली असल्याने अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. सुदैवाने आगीत कोणीही जखमी झालेलं नाही. दरम्यान ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.