झालुटोला सेवा सहकारी संस्थेत गैरव्यवहार

0
7

गोंदियाŸ,दि.२०: विविध सेवा सहकारी संस्था झालुटोलाच्या संस्था चालकांनी नियमबाह्यरित्या कर्ज पुरवठा करुन ७२ लाख १४ हजार ६८९ रुपयाचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दवनीवाडा पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आली असून पोलिसांनी अद्यापही या प्रकरणात पाहिजे तशी चौकशी आणि तपास न केल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. जिल्हा उपनिबंधक सेवा सहकारी संस्थेकडे विद्यमान अध्यक्ष प्रितीचंद चौधरी, विजय पिपरेवार, प्रकाश कावळे, अरqवद रामटेके व इतर संचालकांनी तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या आधारे लेखा परिक्षक श्रेणी-२ सुनील दहाधाने यांनी झालुटोला विविध सेवा सहकारी संस्थेच्या आर्थिक हिशोबाची चौकशी केली असता मंजूर वाटप कर्ज, मुदत रक्कम १ ते ४५ यामध्ये ४७ लाख ९१ हजार ६०० रुपये कर्जदार सभासदास नियमबाह्य रित्या पुरवठा केल्याचे व दैनंदिन पुस्तिकेत नोंद न करता ८६ सभासदांची रक्कम १३ लाख १६ हजार ९१७ रुपये बचत खात्यातील विड्राल केलेली रक्कम नोंद न घेता अपहार केल्याचे तसेच एकाच कर्जदार सभासदाला दुसèया सेवा सहकारी संस्थेमार्फत कर्ज वाटप केल्याचे प्रकरण लेखा परिक्षणात आढळून आले. दैनंदिन पुस्तिका, कॅशबूक तपासणीमध्ये १ लाख ९४ हजार ६७५ रुपये वसूलीस माजी संचालक मंडळ पात्र असल्याचे आढळून आले. लेखा परीक्षणात संस्थेचे माजी अध्यक्ष कुंवरलाल बिसेन, सचिव दुर्योधन हेडाऊ, दवनीवाडा बँक शाखेचे व्यवस्थापक जी.व्ही. तिडके, निरीक्षक डी.बी. बडगूजर, शिवराम निपाने हे जवाबदार असल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे.