कामाचे तुकडे पाडण्यास पीडब्लूडीचा ब्रेक

0
16

गोंदिया,दि.20 : विशिष्ट लोकांच्या सोयीसाठी मोठ्या बांधकामांचे तीन-तीन लाखांचे तुकडे पाडण्याच्या कार्यपद्धतीला ब्रेक लावण्यात आल्याने मजूर कामगार सहकारी संस्था आणि छोट्या कंत्राटदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याने शनिवारी आदेश जारी करून रस्ते, पूल, इमारती प्रकल्पांची बांधकामे, दुरुस्ती व इतर बांधकामांबाबत नवी कार्यपद्धती सुचविली आहे. तीन लाखांवरील सर्वच कामांसाठी ई-टेंडरिंग बंधनकारक केले आहे. परंतु कोणतेही काम तीन लाखांच्या आत ठेवून त्यातूनही पळवाट शोधण्यात आली आहे. एकाच कामाचे अनेक तुकडे पाडले जातात. या प्रकारामुळे बांधकामांची गुणवत्ता धोक्यात आली. कोणत्याही कामाचे तीन-तीन लाखांचे तुकडे पाडण्यास मनाई केली आहे. त्याऐवजी एकाच एजन्सीला काम देऊन ई-टेंडरिंग करण्याचे बंधन घातले आहे