अजमेर – सियालदाह एक्स्प्रेसला अपघात

0
21

कानपूर, दि. 28 – कानपूरमधील रुरा स्टेशनजवळ एक्स्प्रेसचे 14 डबे रुळावरुन घसरले आहेत. अपघातामुळे कानपूर मार्गाच्या रल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अपघातामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले असून यामध्ये ट्रेनच्या गार्डचाही समावेश आहे.
अजमेर – सियालदाह एक्स्प्रेसला हा अपघात झाला आहे. अजमेर – सियालदाह एक्स्प्रेसचे (12988) 14 डबे पहाटे साडे पाचच्या सुमारास रुळावरुन घसरले आहेत अशी माहिती रेल्वे अधिका-याने दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच कानपूर रेल्वे विभागाच्या अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरु आहे. या अपघातामुळे दिल्ली-हावडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.