बेपत्ता ‘जय’ अखेर सापडला…?

0
23

गोंदिया,दि.27- नागपूर व भंडारा जिल्ह्याच्या सिमेत असलेल्या पवनी- उमरेड-कऱ्हाडला जंगलातून एप्रिल 2016 मध्ये बेपत्ता झालेला ‘जय’ वाघ सापडल्याचा दावा तेलंगणा सरकारने केला आहे. एप्रिल महिन्यापासून जय बेपत्ता आहे.जय च्या शोधासाठी 100 पथके तयार करण्यात आली होती.दरम्यान हत्येचा आरोपावरुन सीबीआय चौकशीचे आदेशही देण्यात आले होते.परंतु जय वाघ तेलंगणाच्या पैनगंगा जंगलात दिसल्याची माहिती तेलंगणाच्या एका खासगी वृत्तवाहिन्यांनी दिल्याने नवी आशा वर्षाच्या शेवटी पल्लवीत झाली आहे. तसेच या वृत्ताला तेलंगणाचे वनमंत्री जुगारामण्णा यांनीही दुजोरा दिला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बेपत्ता असलेला आशियातील सर्वात मोठा वाघ ‘जय’ बेपत्ता होता. त्याचा शोधही बरेच दिवस सुरु होता. अखेर आज जय वाघ तेलंगणामध्ये दिसल्याचे वृत्त तेथील एका स्थानिक वृत्तवाहिनीने दिले. त्यानंतर राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तेलांगणाचे वनमंत्री जुगारामण्णा यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन संबधित वाघाचे छायाचित्रासह सविस्तर माहिती मागविली आहे.जेणेकरुन त्यानंतरच महाराष्ट्र सरकार जय बाबत काही बोलणार असे मुनगंटीवार यानी म्हटले आहे.तेलगंना वनमंत्री जुगारामण्णा यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.