विरुरजवळ मालगाडी घसरली;वाहतुक पूर्ण बंद

0
11

चंद्रपूर, दि. 6 – विरुर पासून काही अंतरावर असलेल्या विहिरगाव रेल्वे स्टेशन जवळ मालगाडीचे 12 डबे रात्री घसरले. रात्री 12 वाजल्यापासून वाहतूक बंद आहे. दिल्ली, बंगळुरु, मद्रास, हैदराबादकडे जाणा-या व येणा-या सर्व रेल्वेगाडया बंद आहेत. या मार्गावर प्रवासी आणि मालवाहतुकीसह एकूण साठ गाडया धावतात. हैदराबाद दिल्ली तसेच चेन्नई दिल्ली या दोन प्रमुख रेल्वे मार्गावरची अप आणि डाऊनची वाहतुक पूर्ण बंद झाली.