33.9 C
Gondiā
Wednesday, July 15, 2026
Home Top News पेट्रोल, डिझेल पुन्हा महागले

पेट्रोल, डिझेल पुन्हा महागले

0
17

नवी दिल्ली दि.१६ : पेट्रोल प्रति लिटर ४२ पैशांनी, तर डिझेल १ रुपया ०३ पैशांनी महागले असून ही दरवाढ रविवारी मध्यरात्रीपासून लागू झाली आहे. स्थानिक करांचा यात समावेश नसल्याने विविध राज्यात प्रत्यक्षात ही दरवाढ अधिक असू शकते. पेट्रोलची दीड महिन्यातील चौथी दरवाढ असून डिझेलच्या दरातील एका महिन्यातील तिसरी वाढ आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने तसेच डॉलर आणि रुपया विनियम दरातील तफावतीमुळे ही दरवाढ करावी लागली, आल्याचे सरकारी तेल विपणन कंपनी इंडियन आॅईल कॉर्पोरेशनने सांगितले.