24.8 C
Gondiā
Friday, July 3, 2026
Home Top News गोंदिया जिल्ह्यात नक्षल्यांनी फडकावला काळा झेंडा

गोंदिया जिल्ह्यात नक्षल्यांनी फडकावला काळा झेंडा

0
18

गोंदिया,दि.26- गोंदिया जिल्ह्याच्या अर्जूनीमोरगाव तालुक्यातील राजोली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आज (दि.26) मध्यरात्री नक्षल्यांनी काळा झेंडा फडकावल्याची माहिती आहे. दरम्यान, पोलिस बंदोबस्तात वाढ करीत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.नक्षल्यानी राजोली येथील शाळेच्या आवारात काळा झेंडा फडकावून फलक लावून निषेध नोंदवित खोटे गणतंत्र दिन असल्याचा उल्लेख फलकात केला आहे.26 जानेवारी 1950 ला सवैंधानिक दर्जा प्राप्त झाला असला तरी आजही या देशात धर्मनिरपक्षेतिच्या नावावर हिंदुराष्ट्र तयार करण्याचे काम केले जात आहे.आदिवांसीचे शोषण सुरु असून याविरोधात लढा देऊन या खोट्या गणतंत्राचा निषेध नोंदवित असल्याचा उल्लेख असल्याचा फलक कोरची एरीया कमिटी भाकपा माओवादी असलेल्या संघटनेने लावल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या काही वर्षानंतर पुन्हा एकदा नक्षलचळऴळ गोंदिया जिल्ह्यात फोफावत असल्याने कुठेतरी पोलीस प्रशासन कमजोर तर पडत नसावे ना अशी भिती जनतेमध्ये झाली आहे.