सरकारी कार्यालयांमध्ये ‘पूजाबंदी’- पुरोगामी निर्णय

0
15

मुंबई,दि.25- प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला 25 जानेवारीला महाराष्ट्र सरकारेन पुरोगामी सरकारला साजेसा असा निर्णय राज्य सरकारच्या जलसंधारण आणि ग्रामविकास खात्याने घेतला आहे.या विभागांच्या कार्यालयामध्ये कोणत्याही धर्माच्या धार्मिक विधींना बंदी घालण्यात आली आहे. शिवाय इमारतींच्या भिंतीवर धार्मिक घोषणा लिहण्यासही मनाई करण्यात आली आहे. शिवाय देवदेवतांचे फोटोही लावण्यास सरकार निर्णयाने मनाई करण्यात आली आहे.त्यामुळे सरकारी कार्यालयात विराजमान असलेले देवदेवतांचे छायाचित्र कधीपर्यंत हटविण्यात स्थानिक प्रशासन पुढाकार घेते याकडे आता लक्ष लागले आहे.
सरकारी कार्यालयांतील सत्यनारायण पुजा आता कायद्यानुसार अवैध ठरणार आहेत. फडणवीस सरकारने यासंदर्भात शासननिर्णय काढला असून शासकीय कार्यालयांत सत्यनारायण किंवा तत्सम पुजा करण्यावर बंदी घातली आहे. मंत्रालय आणि राज्यभरातील अनेक जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये सत्यनारायण पुजेसह अनेक धार्मिक विधीचे कार्यक्रम घेतले जातात. आता यापुढील काळात अशा कार्यक्रमाना सरकारने कायद्याने बंदी करून पहिल्यांच पुरोगामी निर्णय घेतला आहे.