पंढरपुरात 90 स्फोटके, 291 जिलेटिनच्या कांड्या जप्त

0
19

पंढरपूर,दि.28: जीपमधून स्फोटकांची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून 99 स्फोटके आणि 291 जिलेटिनच्या कांड्या जप्त केल्या. ओझेवाडी-रांजणी रस्त्यावर पोलिसांनी ही धडक कारवाई केली.अवैधरित्या स्फोटकांची वाहतूक करणाऱ्या बोलेरो जीप पोलिसांनी ताब्यात घेतली असून, यातून 90 स्फोटके आणि 291 जिलेटिनच्या कांड्या जप्त केल्या. पंढरपूर तालुक्यातील ओझेवाडी-रांजणी रस्त्यावर एका जीपमधून ही स्फोटके नेत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने तातडीने या मार्गावर सापळा रचला आणि विनापरवाना स्फोटकांची वाहतूक करीत असल्याचे समोर आले.पेनूर येथील जयभवानी इंटरप्रायझेसचा परवाना नूतनीकरण केलेला नसताना स्फोटकांची विक्रीसह वाहतूक होत असल्याचे समोर आले असून, याबाबत पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनला याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी स्फोटकांची वाहतूक करणारे अंकुश भीमराव गव्हाणे आणि संतोष भीमराव गव्हाणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.