अफगाणिस्तानात हिमस्खलनामुळे 100 जणांचा मृत्यू

0
5

काबूल,वृत्तसंस्था दि. 6 – अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. बर्फवृष्टीमुळे अफगाणिस्तानात झालेल्या हिमस्खलनाच्या दुर्घटनांमध्ये 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. बर्फवृष्टीमुळे बचावकार्यात अडथळे येत असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात जात आहे. नुरिस्तान प्रांतातील एकाच गावातील 50 जणांचा मृत्यू झाला आहे.
आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाचे प्रवक्ते उमर मोहम्मदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील 34 पैकी 22 प्रांतात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. हिमस्खलनाच्या घटनेत परिसरातील लोकांची घरं पूर्णतः उद्घवस्त झाली असून येथील रस्तेही ठप्प पडले आहेत. जवळपास 168 घरं उद्धवस्त झाली असून 340 गुरे दगावली आहेत. दुर्घटनास्थळी बचाव पथक पाठवण्यात आले आहे, मात्र बर्फवृष्टीमुळे रस्ते वाहतूक ठप्प असल्याने बचावकार्यात अडथळा येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्याने भारतातही सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील काही क्षेत्रांमध्ये हिमस्खलन होण्याचा इशारा देण्यात आला आहे.