31.1 C
Gondiā
Wednesday, June 24, 2026
Home Top News आमदार परिचारकांविरोधात सैनिकांचे आंदोलन, पंढरपूर बंद

आमदार परिचारकांविरोधात सैनिकांचे आंदोलन, पंढरपूर बंद

0
24

पंढरपूर, दि. २२ – भारतीय जवानांविरोधात अपशब्द वापरणारे आमदार प्रशांत परिचारक यांचा निषेध करत माजी सैनिकांनी आंदोलन पुकारले असून पंढरपूर शहरातही कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. आज सकाळपासूनच शहरात आंदोलनाचे वातावरण तापले असून बाजारपेठाही बंद आहेत तसेच रस्त्यावर शुकशुकाट पसरला आहे. स्टेशन रोड, नवी पेठ, शिवाजी चौकातील दुकाने तसेच शहरातील पेट्रोल पंपही बंद ठेवण्यात आले आहेत. आंदोलकांनी परिचारक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.