अहमदाबाद-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन यांनी आपल्याला देण्यात आलेल्या सुरक्षेसंदर्भात माहिती अधिकार कायद्याखाली (आरटीआय) मागविलेली माहिती देण्यास मेहसणा पोलिसांकडून नकार देण्यात आला आहे.
जशोदाबेन यांना पुरविण्यात आलेल्या सुरक्षेसंदर्भात त्यांनी मागविलेली माहिती स्थानिक गुप्तचर संस्थेशी (एलआयबी) संबंधित होती. त्यामुळे आम्ही त्यांना माहिती दिलेली नाही, असे मेहसाणा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक जे. आर. माठोलिया म्हणाले.
सध्या आपल्याला कशा प्रकारचे सुरक्षा कवच देण्यात आले आहे आणि आपण त्यासाठी पात्र आहोत काय, अशी माहितीच्या अधिकारात विचारणा करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांनी मेहसाणाच्या पोलिसांना पाठविले होते. सुरक्षा व्यवस्थेच्या मुद्दय़ावरून पंतप्रधानांची पत्नी म्हणून आपले काय अधिकार आहेत, हे जाणून घ्यावयाचे आहे, असे त्यांनी या पत्रान्वये विचारले होते. जशोदाबेन या मेहसाणा जिल्ह्य़ातील उंझा या शहरात आपले बंधू अशोक मोदी यांच्यासमवेत राहात असून, मोदी यांचा पंतप्रधानपदी शपथविधी झाल्यानंतर त्यांना पोलिसांनी सुरक्षा पुरविली आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा