प्रशांत परिचारक दीड वर्षांसाठी निलंबित

0
9

मुंबई, दि. 9 – भारतीय सैनिकांच्या पत्नींबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने वादात सापडलेले भाजपा आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विधानपरिषद सभापतींनी प्रशांत परिचारक यांना दीड वर्षांसाठी निलंबित केले आहे. प्रशांत परिचारक यांच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रशांत परिचारक यांच्या निलंबनासाठी मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी केली होती, ज्यामुळे सभागृहाचं कामकाज अर्धा तासासाठी तहकूबही झाले होतं.परिचारकांच्या वक्तव्याच्या चौकशीसाठी 9 सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर अध्यक्ष असतील. समितीचा अहवाल पावसाळी अधिवेशनापर्यंत मांडण्यात यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

कोण असणार समितीत –
रामराजे निंबाळकर, धनंजय मुंडे, नारायण राणे, निलम गो-हे, चंद्रकांत पाटील, सुनील तटकरे, कपिल पाटील, जयंत पाटील, शरद रणपीसे