अकोल्यात आरआरसी कॉम्प्लेक्समध्ये अग्नितांडव

0
9

अकोला, दि. 20 – अकोल्यातील गांधी रोडवरील आरआरसी कॉम्प्लेक्समधे असलेल्या झी महासेलच्या दुकानाला भीषण आग लागली. या भीषण आगीत दुकान पूर्णपणे जळून खाक झाले आहे. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना असून फायर ब्रिगेडच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. फायर ब्रिगेडच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.दरम्यान, घटनास्थळ अतिशय वर्दीळचं असून आग आटोक्यात न आल्यास मोठी हानी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.