ट्रक अपघातात दोन इसमांसह सात जनावराचा मृत्यू

0
10

गोंदिया,दि.२७- गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातंर्गत येणाèया सुपलीपर गावशिवाराजवळ आज पहाटे ४ वाजे दरम्यान अज्ञात टड्ढक चालकाने बैल घेऊन जाणाèया दोघाना मागून धडक देत चिरडल्याने दोघांसह सात बैलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.मृतामध्ये सत्यवान बहेकार आणि नामदेव मेंढे या दोघांचा समावेश आहे.
सुपलीपर येथील सत्यवान बहेकार आणि नामदेव मेंढे हे बैल विक्री करणारे व्यावसायिक असून गोंदिया तालुक्याच्या काटी येथून जनावरे खरेदी करुन ते छत्तीसगड राज्यातील डोंगरगढ येथे विक्रीला घेऊन जाण्यासाठी सुपलीपार येथून पहाटे ३.३० वाजता निघाले.घरापासून काही अंतरावर जात नाही तोच गोंदियाकडून येणाèया अज्ञात ट्रकचालकाने या दोघांना जबर धडक दिली.यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यु झाला.तर सोबत जी जनावरे होती,ती एकमेकांना दोरीने बांधलेले असल्याने त्यांनाही चिरडल्याने त्यांचा मृत्यु झाला.घटनास्थळावरून कुणीच नसल्याचे बघत ट्रकचालकाने पळ काढला.आमगाव पोलिसांनी घटनास्थळी पोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.मृतदेहांचे उत्तरीय तपासणी करुन कुटुqबयाना सोपविले.