डॉक्टर महिलांनी 9 तर पुरुषांनी 18ml पेक्षा जास्त घेऊ नये – आयएमए

0
11
नवी दिल्ली ,दि.26- काही डॉक्टरांच्या बेजबाबदार वर्तनामुळे त्रस्त झालेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) नवीन आचारसंहिता तयार केली आहे. डॉक्टरांनी सोशल मीडियावरही कोणत्या पोस्ट कराव्या आणि काय टाळावे यासाठीच्या सूचना यात देण्यात आल्या आहेत. पेशंट्सबद्दल डॉक्टरांनी सोशल मीडियावर चुकीची किंवा खोटी माहिती देऊ नये असे स्पष्ट निर्देश आयएमएने दिले आहे. त्यासोबत डॉक्टरांनी जाती आणि धर्माच्या आधारे पेशंट्ससोबत भेदभाव करु नये हा गुन्हा असल्याचे म्हटले आहे. आयएमएने डॉक्टरांना व्यवसाय बाह्य लोकांसोबत मद्यपान करण्यापासूनही दूर राहाण्यास सांगितले आहे. तसेच महिला आणि पुरुष डॉक्टरांनी किती मद्यसेवन करावे याची मर्यादाही घालून दिली आहे. पुरुष डॉक्टरांसाठी 18 मिली तर महिला डॉक्टरांसाठी ही मर्यादा 9 मिली निर्धारित करण्यात आली आहे.