घाटकोपरमध्ये चार मजली इमारत कोसळली

0
9

मुंबई, दि. 25 – घाटकोपरच्या दामोदर पार्क येथे मंगळवारी सकाळी एक चार मजली इमारती कोसळली. या इमारतीत रहिवाशी रहात होते तसेच इमारतीच्या तळमजल्यावर एक रुग्णालय होते अशी माहिती आहे. 8 ते 10 जण ढिगा-याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. दुर्घटना घडली त्यावेळी रुग्णालयात काही रुग्णही उपचारासाठी दाखल होते.
पोलीस, पालिका प्रशासनाचे अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून, युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे. स्थानिक रहिवाशी सुद्धा बचावकार्यात प्रशासनाला मदत करत आहेत. ही जुनी जर्जर इमारत होती असे तिथे रहाणा-या स्थानिकांनी सांगितले.