बलात्कारी रामरहीमला 10 वर्षांची शिक्षा

0
27

दिल्ली(वृत्तसंस्था)दि.28-आश्रमातील दोन महिला अनुयायींवरील बलात्कार प्रकरणी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत रामरहीम सिंग याला सीबीआयच्या कोर्टाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सोबतच कोर्टाने रामरहीम याला तीन वेगवेगळ्या कलमांखाली 50,000, 10,000 आणि 5000 रुपयांचा दंडही ठोठावला होता. कोर्टाची कार्यवाही सुरु असताना रुममध्ये केवळ आठ जण उपस्थित होते.
कोर्टरुममध्ये एक तास कार्यवाही चालल्यानंतर सीबीआयच्या विशेष कोर्टाने न्यायाधीश जगदीप सिंग यांनी निकाल दिला आहे. 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्याचे समजताच रामरहीमला धक्का बसला. तो जमिनीवर बसला आणि रडू लागला. तो जोरात आरडाओरडडी करत होता. तत्काळ कोर्टरुम बाहेर तैनात असलेले कमांडो कोर्टरुममध्ये दाखल झाले आणि त्यांनी रामरहीमला बाजूला केले.
न्यायाधिश जगदीप सिंग चॉपरने पंचकूलाहून रोहतकमधील सुनारिया तुरुंगात पोहोचेले होते. रामरहीमला कोणती शिक्षा होते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. दरम्यान, शुक्रवारी त्याला कोर्टाने दोषी ठरवले होते. या दरम्यान बाबाच्या समर्थकांनी पंजाबसह हरियाणात प्रचंड हिंसाचार करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर बाबा शिक्षा झाल्यानंतर हिंसाचार करणार्‍यांवर थेट गोळ्या झाडण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.