मुंबईच्या भेंडी बाजारात 5 मजली इमारत कोसळली

0
27

मुंबई,दि.31 – जे.जे. मार्ग परिसरातील ‘हुसैनीवाला’ ही 5 मजली इमारत आज (गुरुवारी) सकाळी 8.30 च्‍या सुमारास कोसळली. भेंडीबाजार पाकमोडिया स्‍ट्रीट भागातील या इमारतीत 10 ते 12 कुटुंबे राहत असल्‍याची माहिती समोर येत आहे. ढिगार्‍याखालून 6 जणांना बाहेर काढण्‍यात जवानांना यश आले आहे. त्‍यापैकी तिघांचा जे.जे. रुग्‍णालयात उपचार चालू असताना मृत्‍यू झाला आहे. इतर दोघांवर जणांवर उपचार सुरु आहेत.दुर्घटनाग्रस्त इमारत 100 ते 150 वर्षे जुनी असल्‍याची माहिती समोर आली आहे. महापालिकेने या इमारतीचा समावेश धोकादायक इमारतींमध्‍ये का केला नव्‍हता? असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.

अग्निशमन दलाच्‍या 10 गाड्या आणि एनडीआरएफ जवानांचे पथक घटनास्‍थळी दाखल झाले आहे. किमान 30 ते 35 जण ढिगार्‍याखाली अडकल्‍याची भीती वर्तवण्‍यात येत आहे.